पुणे : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या व्यापार करामुळे जगभरातील अनेक देश चिंतेत आहेत.या अतिरिक्त व्यापार कराचा फटका भारतालाही बसल्याचं दिसत आहे. त्याचा विपरीत परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच रिझर्व बँक ऑफ इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे.बँकेकडून रेपो रेटच्या दरात 25 बेसिस पॉइंट्स एवढी कपात केली आहे. त्यामुळे हा दर आता 6 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
रिझर्व्ह बँकेने दुसऱ्यांदा ही कपात केली आहे. बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.बँकेने रेपो दर कमी केल्याने पुढील काही दिवसांत गृह, वैयक्तिक, वाहन, आणि ठेवींवरील व्याजदर कमी होणार आहेत. त्यामुळे कर्जाचे हप्ते कमी होऊन एकप्रकारे सर्वसामान्य नागरिकांवरील कर्जाचा बोजा कमी होणार आहे
दरम्यान अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी लादलेला भारतावरील हा कर म्हणजेच टेरिफ तब्बल 26 टक्के असून त्याची अंमलबजावणी बुधवारपासून (ता. 9) सुरू झाली आहे. त्याचा विपरीत परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होण्याची भीती असतानाच रिझर्व बँकेकडून मोठं पाऊल उचलण्यात आल आहे.आरबीआयकडून कमी व्याज दरात बँकांना कर्ज मिळाले तर संबंधित बँकांकडूनही ग्राहकांना कर्ज देताना कमी व्याज दर दिला जाईल. बँकेच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या कर्जाचा बोजा कमी होणार असल्याचे दिसून येत आहे.