Reserve Bank of India : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आज सलग तिसऱ्यांदा रेपो रेट कमी केला आहे. यावेळी आरबीआयने रेपो रेटमध्ये 50 बेस पॉईंट्स म्हणजेच 0.50 टक्क्यांनी कमी केला आहे. रिझर्व्ह बँकेचे राज्यपाल संजय मल्होत्रा यांनी शुक्रवारी रेपो दरात घट जाहीर केली आहे. यापूर्वी रेपो रेट 6.00 टक्के इतका होता. आता 5.50 टक्क्यांपर्यंत आला आहे.

रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समिती बैठकीचा आजचा शेवटचा दिवस होता. या बैठकीत रेपो रेट कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संजय मल्होत्रा यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत त्यांनी याबाबत घोषणा केली आहे.

आरबीआयने यावर्षी रेपो रेट तीन वेळा कमी केला आहे. फेब्रुवारी महिन्यात 0.25 टक्क्यांनी रेपो रेट कमी केला होता. त्यानंतर, 9 एप्रिल रोजी आणखी 0.25 टक्क्यांनी रेपो रेट कमी करण्यात आला. आजच्या बैठकीत रेपो रेटमध्ये 0.50 टक्के कपात करण्यात आली आहे.

2025 मध्ये, रेपो दर तब्बल 5 वर्षांनंतर पहिल्यांदाच कमी झाला. आरबीआयने मे 2020 मध्ये कोविडच्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेला वेग देण्यासाठी रेपो दारात 0.40 टक्के इतकी कपात केली होती.
त्यानंतर जून 2025 मध्ये आरबीआयने रेपो दर 6.5 टक्क्यांपर्यंत वाढवला होता. जून 2023 नंतर फेब्रुवारी 2025 मध्ये प्रथमच रेपो दरात बदल झाला.
सामान्य नागरिकांवर काय परिणाम होणार?
आरबीआयच्या या निर्णयामुळे देशातील सामान्य लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. रेपो रेटमध्ये कपात केल्यामुळे, आता होम लोन, कार लोन, यांचे ईएमआय कमी होतील तसेच नवीन कर्ज घेणाऱ्यांना कमी दरात कर्ज उपलब्ध होईल.







