पुणे : मांढरदेव (ता.वाई,जि.सातारा) येथील श्री काळूबाई देवीची पुढील महिन्यात यात्रा आहे. मांढरदेवीच्या दर्शनासाठी सर्वाधिक भाविक हे पुणे- भोर मार्गे जात असतात.
या पार्श्वभूमीवर काळूबाई देवीच्या होणाऱ्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर भोर-मांढरदेव मार्गावरील अंबाडखिंड घाटातील रस्त्याची दुरुस्ती करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
रस्त्यावर पडलेले खड्डे यांची डागडुजी करून दिशादर्शक फलक बसविले आहेत. घाटातील रस्त्यात वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या झाडाझुडपांची, गवत- वेलींची साफसफाई करण्यात येत आहे.
भाविक व प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन या रस्त्याची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे. भोरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने घाटातील धोकादायक ठिकाणच्या रस्त्यावर सुरक्षिततेच्या उपाययोजना करीत आहेत.