पुणे : कोणतेही नाते परफेक्ट नसते. पण तरीही काही गोष्टी अशा असतात ज्या दोन व्यक्तींना नात्यात ठेवण्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. पती-पत्नी दोघांनीही आपलं नातं घट्ट करण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.पती-पत्नीचे नाते हे खुप सुंदर व नाजूक असते. ते आणखी घट्ट करण्यासाठी तुम्ही या बेसिक गोष्टी फॉलो करु शकता.
सीक्रेट ठेवू नका
सीक्रेट ठेवल्याने तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये गैरसमज होऊ शकतात. अशा वेळी सत्य कितीही कटू असले तरी ते तुम्हाला अनेक समस्यांपासून वाचवू शकते हे खूप महत्त्वाचे आहे. ते सीक्रेट ठेवण्याऐवजी जोडीदारासोबत सर्व काही क्लियर ठेवावे.तुम्ही नेहमी सत्य बोलण्यावर विश्वास ठेवावा.
एकमेकांचा आदर करा-
प्रेमाच्या नात्यात एकमेकांचा आदर केला पाहिजे. कोणत्याही नात्यात आदर खूप महत्त्वाचा असतो. तुमच्या जोडीदाराची नोकरी, शिक्षण, दिसणे, कुटुंब यांचा आदर करून तुम्ही त्यांच्या हृदयात तुमचे स्थान निर्माण करू शकता.
जोडीदाराच्या समस्या ऐका-
प्रत्येकाच्या समस्या आपण सोडवू शकतो असे नाही. पण तरीही आपण कोणाच्या तरी समस्या ऐकून त्यांचे मन हलके करू शकतो. विशेषत: तुमच्या जोडीदाराची अपेक्षा असते की तुम्ही त्यांच्या समस्यांना आपले समजून त्यांच्या समस्या ऐकून घ्याल.
छोटय़ा-छोटय़ा गोष्टींची काळजी घ्या-
तुमच्या जोडीदाराच्या आवडी निवडी किंवा नापसंतीसोबतच त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घेतली पाहिजे. आनंदासोबतच त्यांच्या कम्फर्ट झोनचीही काळजी घेतली पाहिजे. विशेषतः घरातून काम करताना दोघांनी एकमेकांची काळजी घेतली पाहिजे.जोडीदाराच्या छोटय़ा-छोटय़ा गोष्टींची काळजी घेतल्याने नातं अधिक घट्ट होतं.