पती-पत्नीचे नातं हे विश्वासाचे असते. त्यामुळे हे नातं टिकवणं तेवढेच गरजेचे असते. पण, अशा काही गोष्टी असतात, त्याने नात्यात कटुता येते. हे टोकाला जाऊन अखेरीस घटस्फोटापर्यंत विषय जातो. मात्र, घटस्फोटाचा निर्णय घेण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असते. त्याने नातं पुन्हा मजबूत होऊ शकतं.
काहीवेळा सतत भांडणे टाळण्यासाठी छोटा ब्रेक घेणे गरजेचे असते. तुमचं नातं खरंच संपलं आहे का किंवा सुधारायला वाव आहे का याचा विचार करण्याची ही वेळ तुम्हाला संधी देईल. जुन्या आठवणी ताज्या करा. लग्नाचे ते क्षण आठवा जेव्हा तुम्ही दोघे एकत्र आनंदी होता. शक्य असल्यास, भूतकाळात तुम्हाला जवळ आणलेल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हा दोघांना बोलणे सोयीचे वाटत नसेल तर रिलेशनशिप कौन्सिलरला भेटा. समुपदेशन केवळ समस्या सोडवण्याचा मार्ग देऊ शकत नाही, तर नातेसंबंधांना पुन्हा संधी देण्यासाठी दिशा देखील देऊ शकते.
तसेच एकमेकांचा दृष्टीकोन समजून घ्या. घटस्फोट घेण्यापूर्वी, आपल्या जोडीदाराचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या जीवनात आणि भावनांमध्ये काय चालले आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. हा दृष्टीकोन तुमचा निर्णय देखील बदलू शकतो. एकमेकांशी मोकळेपणाने बोला. अनेकवेळा केवळ गैरसमजातून समस्या निर्माण होतात. त्यामुळे याकडेही लक्ष द्यावे.