लहू चव्हाण
पाचगणी : Mahabaleshwar News – श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकटदिन सोहळ्यानिमित्त नरवीर तानाजी मालुसरे यांची जन्मभूमी असलेल्या गोडवली (ता.महाबळेश्वर) (Mahabaleshwar) येथे आयोजित केलेल्या धार्मिक सोहळ्याला ग्रामस्थ व परिसरातील स्वामी भक्तांनी मोठा प्रतिसाद दिला. (Mahabaleshwar News)
रामनवमी उत्सवाचे औचित्य साधून श्रींना अभिषेक
रामनवमी उत्सवाचे औचित्य साधून श्रींना अभिषेक घालण्यात आला. दुपारी साडेतीनच्या सुमारास नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मारकापासून ढोल ताशांच्या गजरात स्वामी नामाच्या जयघोषात श्रींच्या पालखी सोहळ्यास सुरुवात झाली. हा पालखी सोहळा मंदिराला प्रदक्षिणा घालून गावठाण, जिल्हा परिषद शाळा मार्गे ग्रामपंचायत कार्यालयासमोर आला. याठिकाणी भक्तांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचा आस्वाद भक्तांनी घेतला.
सोहळ्याला ग्रामस्थांसह विशेषतः महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सोहळ्याचे आयोजन सर्जेराव मालुसरे यांनी केले. गोडवली गावातील युवक, ग्रामस्थ व परिसरातील स्वामी भक्तांनी परिश्रम घेतले.