पुणे : राज्य परिवहन विभागाने हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बाबत पुणेकरांना मोठा दिलासा दिला आहे… 1, एप्रिल 2019 पूर्वी तयार केलेल्या सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याची आवश्यकता राज्य शासनाने ठरवली आहे .. त्यानुसार राज्य परिवहन विभागाने 31 मार्च 2025 पर्यंतचीं मुदत दिली होती.. परंतु आता ही मुदत वाढवली असल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.आता 30 एप्रिल 2025 पूर्वी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवावी लागणार आहे.

पुणे जिल्ह्यात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे आता 30 एप्रिल 2025 पूर्वी एचएसआरपी बसवून घ्यावी, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे. पुण्यातील वाहन संख्या पाहिल्यावर 25 लाखांपेक्षा जास्त वाहनांना ही नंबरप्लेट बसवावी लागणार आहे. त्यासाठी एका कंपनीला काम देण्यात आले आहे. त्यामुळे 31 एप्रिल 2025 पूर्वी पुणेकरांना नंबर प्लेट बसवणं अनिवार्य आहे.. हे निर्णय वाहतुकीची सुरक्षा वाढवण्यासाठी, वाहनांची ओळख पटवण्यासाठी आणि वाहनावरील छेडछाड आणि बनावटगिरी रोखण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत..
आतापर्यंत जिल्ह्यातुन केवळ पंधरा हजार जणांनी नंबर प्लेटसाठी अर्ज केले आहे. त्यातील सात ते आठ हजार वाहनांना ही नंबरप्लेट बसवण्यात आली आहे.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने एचएसआरटी नंबर प्लेटसाठी नोंदणी करावी लागणार आहे.








