नवी दिल्ली : अंबानी यांच्या मालकी हक्काची असणाऱ्या रिलायन्स पॉवरने कर्जदारांची सर्व थकीत कर्ज फेडली आहेत. त्यामुळे आता रिलायन्स पॉवर ही स्वतंत्रपणे कर्जमुक्त कंपनी बनली आहे. कंपनीकडे सुमारे 800 कोटी रुपयांचे कर्ज होते. मात्र, या संपूर्ण कर्जाची परतफेड करण्यात आल्याची माहिती दिली जात आहे.
रिलायन्स पॉवरची ऑपरेटिंग क्षमता 5900 मेगावॅट आहे, ज्यामध्ये उत्तर प्रदेशातील 3960 मेगावॅट सासन अल्ट्रा मेगा पॉवर प्रकल्प आणि 1200 मेगावॅटचा रोजा थर्मल पॉवर प्लांट समाविष्ट आहे. सासन युएमपीपी हा जगातील सर्वात मोठ्या एकात्मिक कोळशावर आधारित ऊर्जा प्रकल्पांपैकी एक आहे. अशाप्रकारे रिलायन्स पॉवर आपल्या व्यवसायात प्रगती करताना दिसत आहे. त्यामुळेच जे कर्ज होते ते बँकांना परत केले आहे.
रिलायन्स पॉवरने डिसेंबर 2023 ते मार्च 2024 दरम्यान आयडीबीआय बँक, आयसीआयसीआय बँक. एक्सिस बँक आणि डीबीएससह विविध बँकांकडून कर्ज घेतल्याचे सांगण्यात आले. तर हे कर्ज सेटलमेंट करून करारांवर स्वाक्षरी देखील झाल्याची माहिती आहे.