नवी दिल्ली : प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Redmi ने आपला नवा Redmi 14C स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनची सुरुवातीची किंमत 9,999 असून, त्याच्या फीचर्सनुसार किंमती कमी-जास्त होऊ शकतात, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. 10 हजारांपेक्षाही कमी किंमत असणाऱ्या या फोनमध्ये 50MP कॅमेरासह अनेक बेस्ट असे फीचर्स देण्यात आले आहेत.
Redmi 14C या स्मार्टफोनमध्ये 6.88 इंचाचा डिस्प्ले, 50MP कॅमेरा, Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसर आणि 5160mAh बॅटरीही देण्यात आली आहे. चीनची कंपनी Xiaomi ने भारतासह जागतिक बाजारपेठेत बजेट सेगमेंटमध्ये नवीन स्मार्टफोन ‘Redmi 14C’ लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.88-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. फोटोग्राफीसाठी Redmi 14C च्या बॅक पॅनलवर 50-मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा देण्यात आला आहे.
कंपनीने या स्मार्टफोनच्या भारतीय प्रकारात Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसर दिला आहे. हा फोन Android 14 वर आधारित Xiaomi Hyper OS वर चालतो. Redmi ने हा स्मार्टफोन स्टारलाईट ब्लू, स्टारडस्ट पर्पल आणि स्टारसेज ब्लॅक या तीन रंगांमध्ये आणि तीन स्टोरेजसह लाँच केला आहे. 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिएंटची किंमत 9,999 रुपये असणार आहे.