पुणे : तुम्ही देखील चांगल्या नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अनेक रिक्त पदावर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रोजेक्ट असोसिएट या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण एक रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : प्रोजेक्ट असोसिएट
– एकूण रिक्त पदे : 01 पद.
– नोकरीचे ठिकाण : पुणे.
– शैक्षणिक पात्रता : M.Sc.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 25,000/- ते रु.31,000/- पर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल).
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 मार्च 2024.
– अर्ज करण्याचा ई–मेल आयडी : [email protected]; [email protected]