पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे. कारण, जवाहरलाल नेहरू एल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर, नागपूर येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
जवाहरलाल नेहरू एल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर, नागपूर येथे ज्युनियर रिसर्च फेलो आणि सीनियर रिसर्च फेलो या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे.
या प्रक्रियेंतर्गत एकूण 3 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.
जाणून घ्या संपूर्ण भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : ज्युनियर रिसर्च फेलो आणि सीनियर रिसर्च फेलो.
– एकूण रिक्त पदे : 03 पदे.
– नोकरीचे ठिकाण : नागपूर.
– शैक्षणिक पात्रता : एम.एस्सी. रसायनशास्त्र / बी.ई. / बी.टेक. रासायनिक अभियांत्रिकी मध्ये.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 25,000/- ते रु.28,000/- पर्यंत.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 20 ऑगस्ट 2024.
– मुलाखतीचा पत्ता : जवाहरलाल नेहरू ॲल्युमिनियम संशोधन विकास आणि डिझाइन सेंटर, समोर. वाडी पोलीस स्टेशन. अमरावती रोड, वाडी नागपूर- 440023
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.jnarddc.gov.in/ वरून माहिती घेता येणार आहे.