पुणे : तुम्हीदेखील नोकरीच्या शोधात असाल तर आता तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, अकोल्यातील वनविभाग कार्यालयात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, आता अनेक रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्ही माध्यमातून अर्ज करता येणार आहे.
वनविभाग कार्यालय, अकोला येथे पशुवैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय सहाय्यक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला अकोला येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 2 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 50 हजार रुपयांपर्यंत पगारही मिळणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://mahaforest.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : पशुवैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय सहायक.
– रिक्त पदे : 02 पदे.
– नोकरीचे ठिकाण : अकोला.
– वेतन : पशुवैद्यकीय अधिकारी : 50,000, पशुवैद्यकीय सहाय्यक : 20,000.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल).
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 डिसेंबर 2024.
– मुलाखतीची तारीख : 30 डिसेंबर 2024
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : उपवनसंरक्षक, (प्रा.) अकोला वनविभाग अकोला निसर्ग पर्यटन केंद्र, वसुंधरा हॉल, अशोक वाटीका समोर, मंगळूरपीर रोड, अकोला- 444001.
– अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी : [email protected]