पुणे : ‘एचएलएल लाईफ केअर लिमिटेड’ येथे मेगा भरती निघाली आहे. त्यात पात्र उमेदवारांना नोकरीची संधी मिळू शकणार आहे. त्यानुसार, अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही माध्यमातून अर्ज करता येणार आहे.
एचएलएल लाईफ केअर लिमिटेड येथे ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. लेखाधिकारी, प्रशासन सहाय्यक, प्रकल्प समन्वयक, प्रशासन सहाय्यक, केंद्र व्यवस्थापक, वरिष्ठ डायलिसिस तंत्रज्ञ, डायलिसिस तंत्रज्ञ, कनिष्ठ डायलिसिस तंत्रज्ञ, सहाय्यक डायलिसिस तंत्रज्ञ, लेखापाल सह सांख्यिकी अन्वेषक आणि केंद्र व्यवस्थापक या पदांवर भरती केली जात आहे.
यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला संपूर्ण महाराष्ट्रात कुठंही जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 1217 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यात निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. उमेदवाराला दरमहा 8,500 ते 29,500 रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे. या पदासाठी वयोमर्यादाही निश्चित करण्यात आली असून, 38 वर्षे अशी ही वयोमर्यादा असणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : लेखाधिकारी, प्रशासन सहाय्यक, प्रकल्प समन्वयक, प्रशासन सहाय्यक, केंद्र व्यवस्थापक, वरिष्ठ डायलिसिस तंत्रज्ञ यांसह इतर
– एकूण रिक्त पदे : 1217 पदे. (महाराष्ट्र-1207)
– वेतन / मानधन : दरमहा रु. 8,500/- ते रु.29,500/- पर्यंत.
– वयोमर्यादा : 38 वर्षांपर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल).
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 जुलै 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : डीजीएम (एचआर) एचएलएल लाइफकेअर लिमिटेड एचएलएल भवन, #26/4 वेलाचेरी – तांबरम मेन रोड पल्लीकरनई, चेन्नई – 600 100.
– अर्ज पाठवण्याचा ई–मेल आयडी : [email protected]
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.lifecarehll.com/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.