दिल्ली : दिल्ली मेट्रोमध्ये सिक्युरिटी इन्स्पेक्टर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवार delhimetrorail.com या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकता. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ मे आहे.
दिल्ली मेट्रोतील या नोकरीसाठी ५५ ते ६५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड झाल्यावर त्यांना ५११०० ते ५९,८०० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि इंटरव्ह्यूद्वारे केली जाणार आहे. फक्त शॉर्टलिस्टेड केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला अर्जाचा नमुना भरुन ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे. तुम्हाला अधिसूचनेत दिलेला फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह तो एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर (एचआर), दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, मेट्रो भवन, फायर ब्रिगेड लेन, बाराखंभा रोड, नवी दिल्ली-११०००१ येथे पाठवायचा आहे.