पनवेल : पनवेल महानगरपालिका, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आणि राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ही भरती पूर्णतः कंत्राटी स्वरुपात असून करार पद्धतीने मानधन तत्त्वावर निवड करण्यात येणार आहे. या भरतीच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य व्यवस्थपक पदासाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. आरोग्य व्यवस्थपक पदासाठी १ जागा रिक्त आहे. या पदासाठी नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला ३२,००० रुपये पगार महिना देण्यात येणार आहे.
उमेदवार हा जास्तित जास्त ६५ वर्षे असावा. तसेच या भरतीच्या माध्यमातून प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी उमेदवारांना नियुक्त करण्यात येणार आहे. या पदासाठी एक जागा रिक्त असल्याने इच्छुकांनी लवकर अर्ज करण्यात यावा. दरमाह १७,००० रुपये वेतन म्हणून पुरवण्यात येईल. तर जास्तीत जास्त ६५ वर्षे आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
वरील दोन्ही पदांसाठी निवड कंत्राटी पद्धतीने केली जाणार असून ती राज्यशासनाच्या नियमित पदाशी संबंधित नाही. त्यामुळे उमेदवारांनी भविष्यात या पदांना नियमित करण्याची किंवा राज्यशासनाच्या सेवेत समाविष्ट करण्याची मागणी करू नये. अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्रता निकषांना पात्र उमेदवारांनी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2025 आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात आपले अर्ज भरून खालील पत्त्यावर पोस्टाने किंवा थेट पाठवावेत –
पनवेल महानगरपालिका, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय आरोग्य विभाग, सिडको समाज केंद्र, सेक्टर 21, कामोठे, पनवेल – 410206.