अहिल्यानगर: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सध्या विविध पदांसाठी भरती सुरु आहे. अहिल्यानगर येथे ही भरती केली जाणार आहे.बँकेत वसुली एजंट, सरफेसी एन्फोर्टमेंट एजंट, जप्ती एजंट, डिटेक्टिव्ह इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी, सुरक्षा एजन्सी या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
. या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीसाठी तुम्हाला १९ एप्रिलपर्यंत अर्ज करायचा आहे. तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज बँक ऑफ महाराष्ट्र, अंचल कार्यालय, अहिल्यानगर, गुरुकुल, लालटाकी रोड, अप्पू चौक, अहिल्यानगर ४१४००३ येथे पाठवायचा आहे. बँकेत काम करण्याची ही उत्तम संधी आहे. सोबतच जे तरुण अहिल्यानगर येथे राहतात त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे.