नवी दिल्ली : प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Realme ने 2025 या वर्षातील पहिला स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी सुरु केली आहे. Realme 14 Pro असे या सीरीजचे नाव आहे. ही सीरीज 16 जानेवारीला लाँच होणार आहे. आता अखेर कंपनीने ही सीरीज लाँच करण्याचे ठरवल्याने अनेक मोबाईल प्रेमींसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे.
Realme 14 Pro सीरीज हा पहिला रंग बदलणारा स्मार्टफोन असणार आहे, जो नॉर्डिक डिझाईनच्या सहकार्याने आणला आहे. म्हणजेच हवामानात बदल होताना या फोनचा रंगही बदलेल. थंडीच्या वातावरणात या फोनचा रंग बदलेल. Realme 14 Pro मालिका Realme 14 Pro आणि Realme 14 Pro Plus या दोन प्रकारांमध्ये लाँच केली जाणार आहे. ही मालिका चार रंगांच्या पर्यायांमध्ये पर्ल व्हाईट आणि स्यूड ग्रे आणि भारतातील खास प्रकारांमध्ये बिकानेर पर्पल आणि जयपूर पिंकमध्ये लाँच करण्यात येणार आहे.
हा स्मार्टफोन Realme च्या अधिकृत वेबसाईट आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणार आहे. Realme 14 Pro 5G या फोनमध्ये 1.5K रिझोल्यूशनसह क्वाड-वक्र डिस्प्ले आणि अल्ट्रा-थिन 1.6 मिमी बेझल असणार आहे. फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअल कॅमेरा सेटअपही देण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा असणार आहे. जो ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) आणि 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करणार आहे.