RBI News पुणे : केंद्र सरकारने मंगळवारी स्वामीनाथन जानकीरमन यांना भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी बढती दिली आहे. (RBI News) सरकारने त्यांची 3 वर्षांसाठी डेप्युटी गव्हर्नर पदावर नियुक्ती केली आहे. (RBI News) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या डेप्युटी गव्हर्नरपदी सध्या महेश कुमार जैन असून त्यांचा कार्यकाळ २२ जून रोजी समाप्त होत आहे.
(RBI News) जैन हे पर्यवेक्षण, वित्तीय समावेशन आणि विकास, ग्राहक शिक्षण आणि संरक्षण विभागाचे प्रभारी आहेत. (RBI News) आता, या सर्वच पदांची जबाबदारी स्वामीनाथन जानकीरमन यांच्याकडे आली आहे. (RBI News) स्वामिनाथन जानकीरामन हे सध्या एसबीआयचे एमडी आहेत. (RBI News)
महेश कुमार जैन यांच्या जागी स्वामीनाथन जानकीरमन यांची नियुक्ती
महेश कुमार जैन यांची जून २०१८ मध्ये तीन वर्षांसाठी डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांची जून २०२१ मध्ये दोन वर्षांच्या कालावधीसाठी पुनर्नियुक्ती करण्यात आली .त्यांच्या जागेवर आता स्वामीनाथन जानकीरमन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोण आहेत स्वामिनाथन जानकीरामन
स्वामीनाथन जानकीरामन हे सध्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. स्वामिनाथन जानकीरामन यांनी एसबीआयमधील तीन दशकांहून अधिक काळातील त्यांच्या कारकिर्दीत कॉर्पोरेट आणि आंतरराष्ट्रीय बँकिंग, ट्रेड फायनान्स, रिटेल आणि डिजिटल बँकिंग आणि शाखा व्यवस्थापन अशा विविध कार्ये सांभाळली आहेत. त्यांनी एसबीआयमध्ये उपव्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य डिजिटल अधिकारी म्हणूनही काम केले आहे.