पुणे प्राईम न्यूज डेस्क: अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानीने वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. इतकंच नाही तर पदार्पणातच ती भल्याभल्या कलाकारांच्या मुला-मुलींना तगडी टक्कर देत आहेत. ‘आझाद’ या चित्रपटातून राशाने बॉलिवूड इंडस्ट्रीत पहिलं पाऊल टाकल आहे. या चित्रपटातील राशाचं पहिलं गाणं (आयटम साँग) नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित जालं आहे. ‘ऊई अम्मा’ असं या गाण्याचं नाव आहे.हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर अल्पावधीतच समाजमाध्यमांवर तुफान व्हायरल होऊ लागलं आहे. या गाण्यातील तिचा अप्रतिम डान्स,गाण्याचे बोल आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून नेटकरी तिचं भरभरून कौतुक करत आहेत. या एका गाण्याने राशाने सर्व स्टारकिड्सना मागे टाकल आहे. अशी प्रतिक्रिया समाजमाध्यमातून पाहायला मिळत आहे.
राशा थडानीच्या या पहिल्यावहिल्या गाण्याला युट्यूबवर प्रेक्षकांकडून अवघ्या 48 तासांत दीड कोटींपेक्षा अधिक व्हूज आणि 88 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. तिने साकारलेल्या भूमिकेमुळे आणि चेहऱ्यावरील हावभावाने ‘राशाचा हा पहिलाच चित्रपट आहे असं वाटत नाही, राशाने जबरदस्त डान्स आणि हावभाव केले आहेत. तर ‘ओह माय गॉड, स्टारकिड्सकडून आम्हाला अशाच परफॉर्मन्सची अपेक्षा आहे. स्क्रीनवर जणू आम्ही रवीनालाच पाहत आहोत असं वाटतंय. अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून दिली जात आहे. ‘अखेर बऱ्याच वर्षांनंतर एका हिरोईनचा जन्म झाला आहे. राशा तुझं बॉलिवूडमध्ये स्वागत आहे’ अशा शब्दांत नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे.
राशा तिच्या हजरजबाबीपणामुळेही चर्चेत
केवळ तिच्या अप्रतिम नृत्यामुळे आणि हावभावमुळेच नाही तर राशा तिच्या हजरजबाबीपणामुळेही चर्चेत आली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचदरम्यान तिने पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं अत्यंत काळजीपूर्वक दिली आहेत. ती म्हणाली “माझ्या आईने मला सांगितलंय की भगवदत गीतेमध्ये लिहिलंय, कृष्ण यांनी सांगितलंय की तुम्ही केवळ कठोर मेहनत करा. त्यानंतर जे होईल ते सर्व ईश्वरावर सोडून द्या. सिने इंडस्ट्रीत खूप अटॅचमेंट, ओव्हरथिंकिंग आणि चढउतार आहेत. पण तुम्ही प्रत्येकाचं ऐकत बसलात तर तुम्ही त्यातच वाहून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही फक्त मेहनत करत राहा आणि आपली सर्वोच्च कामगिरी करत रहा. बाकी सगळं शिवजी जे काही करतील ते तुमच्या यशासाठीच करतील”, असं उत्तर राशाने दिलं आहे.
राशाचा ‘आझाद’ चित्रपट कधी प्रदर्शित होणार
राशाचा ‘आझाद’ हा चित्रपट येत्या 17 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून राशासोबतच अभिनेता अजय देवगणचा भाचा अमन देवगणसुद्धा बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. या चित्रपटात अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसणार आहे.