बापू मुळीक
पुरंदर : शिधापत्रिकाधारकासाठी ई- केवायसी बंधनकारक केली असून 30 एप्रिलपर्यंत ती पूर्ण करावी लागणार आहे. याआधीची मुदत 31 मार्चपर्यंत होती. त्यानंतर आता प्रलंबित प्रक्रियेसाठी 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही केवायसी न करणाऱ्यांची नावे शिधापत्रिकेवरून वगळली जातील आणि त्यांना शासकीय धान्य वितरणातून वंचित रहावे लागेल, असा स्पष्ट इशारा सरकारने दिला आहे.
सध्या पुरंदर तालुक्यात लाभार्थी 1लाख 73 हजार 791 असून, ही संख्या लाभार्थ्याच्या 70 टक्के आहे. केवायसी पूर्ण केलेले लाभार्थी 1 लाख 17 हजार 127 मात्र अजूनही, 56 हजार 664 एवढ्या नागरिकांची प्रक्रिया प्रलंबित आहे. त्यांना येत्या 30 एप्रिलपर्यंत ई -केवायसी करणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले आहे.अन्यथा धान्य बंद करण्याबरोबरच त्यांची नावे वगळण्यात येणार आहेत.राष्ट्रीय अन्य सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांची ओळख पडताळण्यासाठी ही केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालय व केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, राज्यातील सर्व रेशन दुकानदाराकडून ही प्रक्रिया सुरू आहे. मात्र प्रलंबित अर्जांची संख्या अधिक असल्याने, यापूर्वीही वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली होती.1 लाख 17 हजार 127 जणांचे ई- केवायसी पूर्ण, तर पुरंदर तालुक्यात एकूण लाभार्थी 1लाख 73 हजार 791 ई- केवायसी करण्याचे उद्दिष्ट पुरंदर पुरवठा अधिकारी कार्यालयाला देण्यात आले आहे. येत्या .8 एप्रिलपर्यंत, 56 हजार 664 ग्राहकांचे ई-केवायसी प्रलंबित आहे. ही केवायसी केलेल्यांची संख्या 1 लाख 17 हजार 127 जणांचे ई- केवायसी पूर्ण झाले आहे. तर 56 हजार 664 जणांचे अर्ज पुरवठा अधिकारी याकडे प्रलंबित असून, लवकरच त्यावर कार्यवाही होणार असल्याची माहिती पुरंदर तालुका सहाय्यक पुरवठा अधिकारी अश्विनी वायसे यांनी दिली.
दरम्यान ई- केवायसी 30 एप्रिलपूर्वी पूर्ण करावी,अन्यथा शिधापत्रिका बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी राष्ट्रीय सूचना केंद्राने’ मेरा केवायसी’ हे मोबाईल ॲप विकसित केले आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी या ॲपद्वारे केवायसी पूर्ण करावी असे गोपाळ ठाकरे, पुरंदर पुरवठा अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.