मुंबई : टाटा उद्योगसमूहाचे प्रमुख रतन टाटा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अस्वस्थ असल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कमी रक्तदाबाचा त्रास होत असल्याने रतन टाटा यांना सोमवारी पहाटे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्यावर हृदयरोग तज्ज्ञ डॉ. शाहरुख असपी गोळवाला यांच्या निरीक्षणाखाली त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. डॉ. शाहरुख हे एक विख्यात डॉक्टर आहेत.
रतन टाटा यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली आहे. त्यावेळी ते म्हणाले की, ‘माझ्या आरोग्यासंबंधी काही अफवा पसरत असल्याची मला कल्पना आहे, मला प्रत्येकाला त्यात काही तथ्य नसल्याचं सांगायचं आहे. माझ्या वयामुळे आणि वैद्यकीय कारणांमुळे सध्या माझी वैद्यकीय तपासणी सुरु आहे. चिंतेचं कोणतंही कारण नाही. मी एकदम व्यवस्थित असून, लोकांना आणि मीडियाला कोणतीही चुकीची माहिती न पसरवण्याची विनंती करतो असं रतन टाटा यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितलं आहे.
View this post on Instagram