पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक, शारीरिक शिक्षण संचालक आणि ग्रंथपाल या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला गोंदिया येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 9 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, प्राचार्य/डीन/संचालक, रुपलता देवाजी कापगते महाविद्यालय, कोकणा/खोबा (न.बा.) ता. सडक अर्जुनी, जि. गोंदिया – 441806 असा पत्ता असणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.nagpuruniversity.org/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक, शारीरिक शिक्षण संचालक आणि ग्रंथपाल.
– एकूण रिक्त पदे : 09 पदे.
– नोकरी ठिकाण : गोंदिया.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2024.