पुणे : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माझ्या अंगात देव येतो असे सांगून एका महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ३६ वर्षीय महिलेनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि महिलेची ओळख होती. आरोपी तक्रारदार यांच्या घरी आला होता. त्याने माझ्या अंगात देव येतो यासह वेगवेगळ्या बतावणीकरून महिलेवर प्रभाव पाडला. त्यानंतर वेगवेगळ्या निमित्ताने घरी येऊन या महिलेचा विश्वास संपादन केला. नंतर वारंवार घरी येऊन तो मुक्कामी राहू लागला. योवळी महिला दोन मुलांसोबत एकटीच असताना आरोपी तिच्या बेडरूमध्ये गेला.
त्याने चाकुचा धाक दाखवून त्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केला, असं फिर्यादीत नमूद केले आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपीच्या विरोधात बलात्कार तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास बिबवेवाडी पोलीस करत आहेत.