उरुळी कांचन, (पुणे) : शेलारवाडी (ता. दौंड) येथील रखमाबाई नामदेव जगताप (वय-१०७) यांचे वृद्धपकाळाने गुरुवारी (ता. २१) साडेदहा वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्च्यात पाच मुले, दोन मुली व बारा नातवंडे असा मोठा परिवार आहे.
उरुळी कांचन (ता. हवेली) येथील भाजपा पश्चिम महाराष्ट्र व्यापार आघाडीचे अध्यक्ष विकास (दादा) शिवराम जगताप, खामगाव (ता. दौंड) येथील ग्रामपंचायत सदस्य अतुल गुलाब जगताप व माजी उपसरपंच संदीप शांताराम जगताप यांच्या त्या आजी होत. शेलारवाडी स्मशानभूमी येथे दुपारी २ वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.