पुणे : कल्याण अत्याचार प्रकरण ताजेच असताना पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये शेजारीच वास्तव्यास असणाऱ्या परप्रांतीय 54 वर्षीय नराधमाने दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार करुन खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पुण्यासह राज्यात एकच खळबळ उडाली असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी देखील या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. राजगुरुनगरमध्ये धक्कादायक मनाला अतीव वेदना देणारी घटना घडली आहे. एका नराधमाने दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार करून त्यांचा जीव घेतल्याचे वाघ म्हणाल्या.
वाघ म्हणाल्या की, राज्याचे मुख्यमंत्री आपले देवाभाऊ राज्यातील बहीणींच्या व त्यांच्या लेकींच्या संरक्षणासाठी रात्रंदिवस काम करत आहेत. या नराधमांच्या फक्त मुसक्या आवळणार नाही तर त्यांना फाशीवर लटकवण्याचं काम करतील, हा विश्वास राज्यातील समस्त बहीणींना असल्याचे वाघ म्हणाल्या आहेत.
रात्री 8 वाजता पालकांनी पोलिस स्टेशनला मुली हरवल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी गुन्हा नोंद करत तात्काळ शोध सुरु केला होता. त्यानंतर चार तासांत आरोपीला पकडण्यात आले. आरोपी या लहानग्या मुलींचा, त्यांच्या परीवाराच्या ओळखीचा होता. या चिमुकल्यांचा परीवार खाली तर आरोपी वरच्या माळ्यावर राहत होता. हा 54 वर्षांचा आरोपी. कुठून ही विकृती समाजात आली? याचा खरंच शोध घ्यायला हवा असेही वाघ म्हणाल्या.
95 टक्के घटनांमध्ये ओळखीचे किंवा नातेवाईकच गुन्हेगार..
चित्र वाघ पुढे म्हणाल्या की, 95 टक्के घटनांमध्ये ओळखीचे किंवा नातेवाईकच गुन्हेगार निघतात. त्यामुळे आता पालकांनी आणि प्रत्येक जबाबदार नागरिकांनी सावध व्हायला हवं. गुन्हा घडण्याआधी गुन्हेगारांच्या नांग्या ठासल्याच गेल्या पाहिजेत. त्यासाठी सर्वात आधी आपण सावध राहून योग्य ते पाऊल उचलायला हवं असेही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
रामखोर आरोपीला फाशीवर लट्कवणार..
राज्याचे मुख्यमंत्री आपले देवाभाऊ राज्यातील बहीणींच्या व त्यांच्या लेकींच्या संरक्षणासाठी रात्रंदिवस काम करत आहेत. या नराधमांच्या फक्त मुसक्या आवळणार नाहीत तर त्यांना फाशीवर लटकवण्याचं काम करतील हा विश्वास राज्यातील सर्व बहीणींना असल्याचे वाघ यांनी नमूद केले. लहानग्या चिमुरडींना परत आणू शकत नाही पण या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आपणही सगळे सजग राहू असेही ते म्हणाले. संशयास्पद व्यक्ती संशयास्पद हालचाली आढळल्या तर तात्काळ 112 वर पोलिसांना संपर्क करावा, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं आहे. तसेच राजगुरू नगरच्या घटनेत चांगल्यात चांगले सरकारी वकील देऊन या हरामखोर आरोपीला फाशीवर लटकवल्या शिवाय आम्ही शांत बसणार नाही. असेही चित्रा वाघ यांनी संघितले.