पुणे : राज्याच्या कमाल तापमानात घट झाल्याने विदर्भात आलेली उष्णतेची लाट आता ओसरली आहे. त्यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजासह पावसाचीं शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
आज उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार,धुळे, जळगाव, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाला पोषक हवामान आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज पुण्यातील तापमान 22 अंश सेल्सिअस आहे तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस राहील असा अंदाज आहे.
मंगळवारी सकाळपर्यंतच्या 24 तासात ओडिशातील बौध येथे देशातील उच्चांकित 43.5° तापमानाची नोंद झाली. राज्यात चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४०.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान आज उर्वरित भागात उन्हाचा चटका कायम राहणार आहे.