Weather Update पुणे : राज्याच्या काही भागांमध्ये थंडीला सुरूवात झाली आहे. पहाटे थंडी तर दुपारी भयानक उकाडा जाणवत आहे. अशातच, राज्यासह देशातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्रात सोमवारी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. यात सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. कोकण किनारपट्टीसह राज्यातील सर्व भागात सकाळी थंडी आणि दुपारी उन्हाचा तडाखा जाणवत आहे.
विदर्भात पावसाचा अंदाज नाही
विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला नाही. त्यामुळे नागरिकांनी पावसाच्या हिशोबाने सर्व तयारी करावी. छत्री, रेनकोट जर कपाटात ठेवले असतील पुढच्या काही दिवसांसाठी बाहेर काढावेत. जेव्हा हवामानात काही बदल होणार असतील तर हवामान विभआग तश्या सुचना जारी करत असते.
गेल्या काही दिवसांपासून दक्षिण भारतातील अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पाच नोव्हेंबर ते बारा नोव्हेंबर दरम्यान दक्षिण द्वीपकल्पीय भारतात मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे.