Raigad Sad News | रायगड : एका वृद्ध दाम्पत्याने शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकांना साथ दिली आणि एकाच वेळी देह सोडल्याची दुखद घटना पाथरशेत (ता. रोहा) येथे शुक्रवारी (ता.५) घडली आहे. पतीच्या निधनानंतर पत्नीनेही काही तासाच्या आत जगाचा निरोप घेतला आहे आणि त्यांनी केलेल्या ६५ वर्षांच्या संसाराचा शेवट झाला आहे. या घटनेमुळे रायगड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
गंगाराम महादू घाडगे (वय-८३) आणि निर्मला गंगाराम घाडगे (वय-८०) असे निधन झालेल्या जोडप्याची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गंगाराम घाडगे हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी त्यांचे पुतणे राजेश घाडगे हे गावी गेले होते. त्यावेळी राजेश घाडगे यांनी गंगाराम घाडगे यांची विचारपूस केली. राजेश घाडगे यांच्यासोबत बोलत असतानाच गंगाराम घाडगे यांना उचकी लागली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, हा सर्व प्रसंग निर्मला घाडगे यांनी पाहिली. पतीच्या निधनाचे दुःख सहन न झाल्याने त्याही जागीच कोसळल्या. एकाच वेळी दोघांनीही प्राण सोडल्याने घाडगे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यानंतर या दाम्पत्याची गावातून एकत्र अंत्ययात्रा काढून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गंगाराम घाडगे यांच्यामागे तीन मुले,सुना,नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pachgani News | खिंगर ग्रामपंचायतीचे श्रीनिवास पाटलांनी केले कौतुक