पारनेर : राहुल सकट यांची भीमसेना माथाडी व जनरल कामगार युनियन संघटना पारनेर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भीमसेना माथाडी व जनरल कामगार युनियन संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष दीपक साठे यांनी राहुल सकट यांच्या नियुक्तीची घोषणा केली.
यावेळी युवा उद्योजक ब्रम्हा पठारे, सागर गव्हाणे, योगेश बोरगे, रोहित भोंडे इत्यादी उपस्थित होते. यावेळी उपस्थित असणाऱ्या सर्वांनी राहुल सकट यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.