गणेश सूळ
Rahul Kul | केडगाव : नागरिकांच्या कुठल्याही समस्या असो त्याच्या प्रती ठाम निर्णय घेऊन समस्या सोडविण्यासाठी आमदार ॲड. राहुल कुल नेहमी तत्पर असतात. त्यामुळेच तळागळातल्या जनतेशी त्यांचे घनिष्ठ संबंध निर्माण झाले आहेत. जनतेच्या हितासाठी निर्णय घेत असल्यामुळे एक लोकप्रिय आमदार म्हणून राहुल कुल यांच्याकडे नेहमी पाहिले जाते. असे प्रतिपादन नाथचीवडीचे सरपंच सारिका चोरमले यांनी केले आहे.
नाथचीवडी (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीतील खोक्रोबा वस्ती ते हाके वस्ती या दरम्यानच्या तब्बल १ कोटी ८० लाखाच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन सरपंच सारिका चोरमले यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले आहे. त्यावेळी चोरमले बोलत होते.
यावेळी भीमा पाटस कारखान्याचे संचालक संजय इनामके, योगेश हाके, संदीप गडधे, अनिल चोरमले, वैभव नातू, दादा ठोंबरे ,पंढरीनाथ चोरमले, गजानन वळकुंडे, समीर ठोंबरे, विजय हाके आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना सरपंच सारिका चोरमले म्हणाल्या कि, या रस्त्यावरून शेतकरी वर्गाची मोठी वर्दळ असते. शेतीमाल वाहतूक करण्यासाठी तसेच विविध उद्योग धंद्यासाठी या रस्त्याचा वापर केला जातो. शेजारील गावातील नागरिक मुख्य बाजारपेठेत जाण्यासाठी या रस्त्याचाच वापर करतात. परंतु, या रस्त्याची बिकट अवस्था बिकट झाली होती.
दरम्यान, रस्त्याची व शेतकऱ्यांची गरज ओळखून ॲड. राहुल कुल यांनी या रस्त्याच्या विकासासाठी लवकर निधी उपलब्ध व्हावा. यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले. आणि ॲड. राहुल कुल यांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले असून शासनाकडून तब्बल १ कोटी ८० लाखाचा निधी मंजूर झाला आहे. असे सरपंच सारिका चोरमले यांनी सांगितले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Daund News : कापडी पिशव्या वापरा, पर्यावरण वाचवा : भैरवनाथ शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष भाऊसाहेब ढमढेरे
Daund News : “अमृत भारत” योजनेत दौंड रेल्वे स्थानकाचा समावेश; जंक्शनचा होणार विकास