जेजुरी : जेजुरी दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा बेलसर वाघापूर रस्त्यावर पिकअप ट्रक आणि आयशर गाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून, १४ जण गंभीर जखमी झाल्यची प्राथमिक माहिती मिळत आहे. ही घटना बेलसर-वाघापूर रस्त्यावर पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. जितेंद्र तोतरे, आशाबाई जरे अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, जरेवाडी येथून पिकअप मधून सर्व भाविक जेजुरीला खंडोबा देवाच्या दर्शनासाठी सोमवारी निघाले होते. यावेळी रस्त्यावर त्यांचा अपघात झाला. पिकअप या गाडीतील दोघांचा मृत्यू झाला असून या अपघातात १४ जण गंभीर जखमी झाले असून सर्व जणांच्या हात पायांना गंभीर जखम झाली आहे. जखमींना जेजुरी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या अपघाताचा अधिक तपास जेजुरी पोलीस करत आहेत.