दुबई: मंगळवारी आयपीएल लिलावात एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. पंजाब किंग्जने चुकून एका नको असलेल्या खेळाडूला लिलावात आपल्या संघाचा भाग बनवले. यानंतर सह-मालक प्रीती झिंटा आणि फ्रेंचायझीने खेळाडूला परत करण्याची मागणी केली, परंतु लिलावकर्ता मल्लिका सागरने साफ नकार दिला. लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली असल्याने निर्णय बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे मल्लिका सागर यांनी सांगितले. अशा प्रकारे प्रीती झिंटाच्या संघात नको असलेला खेळाडू दाखल झाला.
पंजाब किंग्जची चूक कशी झाली?
या लिलावात शशांक सिंगचे नाव पुढे आले. या खेळाडूची मूळ किंमत 20 लाख होती. यानंतर प्रिती झिंटाने शशांक सिंगसाठी पॅडल उचलले. पंजाब किंग्जशिवाय इतर संघांनी शशांक सिंगसाठी बोली लावली नाही, त्यामुळे त्याला लवकरच विकण्यात आले. त्यानंतर लिलाव करणारी मल्लिका सागर पुढच्या सेटकडे गेली. त्या सेटमध्ये पहिले नाव तनय त्यागराजनचे होते, तो पर्यंत पंजाब किंग्जला त्यांची चूक कळली होती. खरं तर, पंजाब किंग्जच्या टेबलावर बसलेल्या प्रीती झिंटा, नेस वाडिया आणि इतरांना असे घडले की त्यांनी शशांक सिंगला दुसराच खेळाडू समजले.
…पण मल्लिका आपल्या भूमिकेवर ठाम
मल्लिका सागरने पंजाब किंग्जला विचारले, “हे चुकीचे नाव होते का? तुम्हाला खेळाडू नको होता का?” तुम्ही शशांक सिंगचा उल्लेख करत आहेत का? पण, आता हॅमर खाली आला आहे. 236 आणि 237 क्रमांकाचा खेळाडू तुमच्या टीमचा भाग झाला आहे. यानंतर नेस वाडियाने नाराजी व्यक्त केली, पण मल्लिका आपल्या भूमिकेवर ठाम राहिली. शशांक सिंग नकळत याप्रमाणे पंजाब किंग्जचा भाग बनला.