पुणे : पुण्यातून सर्वाधिक गर्दी असलेली पुणे-हावडा आझाद हिंद एक्सप्रेस, हावडा-पुणे दुरंतो एक्सप्रेस आणि पुणे-संत्रागाची पुणे एक्सप्रेस पुढील 12 दिवस बंद राहणार आहे. यापैकी एकही गाडी पुढील दोन आठवडे धावणार नाही.बिलासपूर विभागात कनेक्टिव्हिटीच्या कामामुळे काही दिवस या मार्गावरील पुण्याकडे ये-जा करणाऱ्या ट्रेन बंद राहणार असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे. त्यामुळे आगाऊ आरक्षण केलेल्या प्रवाशांनाही याचा फटका बसणार आहे.
उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरू असून रेल्वे प्रवाशांची गर्दी वाढू लागली असतानाच आता रेल्वेकडून बिलासपूर विभागातील रायगड -झारसुगुंडा जंक्शनमध्ये कोटारलिया स्थानकावरील चौथ्या मार्गावरी कनेक्टिव्हिटीचे काम सुरू करण्यात येणार आहे. 11 एप्रिल ते 23 एप्रिल या 12 दिवसांदरम्यान रेल्वेचं सदर काम चालू राहणार आहे. हे काम ऐन उन्हाळ्यात आणि प्रवासी हंगाम सुरू असताना करण्यात येत असल्यामुळे याचा अनेक प्रवाशांना फटका बसणार आहे.
रेल्वे गाड्या आणि रद्द करण्यात आलेली तारीख जाणून घेऊया….
*संत्रागाची-पुणे एक्सप्रेस 12 आणि 19 एप्रिल रद्द
*पुणे-संत्रागाची एक्सप्रेस 14 आणि 21 एप्रिल रद्द
*पुणे-हावडा आझाद हिंद एक्सप्रेस 11 ते 24 एप्रिल रद्द
*हावडा-पुणे आझाद हिंद एक्सप्रेस 11 ते 24 एप्रिल रद्द
*हावडा-पुणे दुरांतो एक्सप्रेस 10,12,17 व 19 एप्रिल रद्द
*पुणे-हावडा दुरांतो एक्सप्रेस 12 14 19 व 21 एप्रिल रद्द