Tuesday, June 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Satara Highway: पुणे-सातारा प्रवासाचे टेन्शन विसरा! 45 मिनिटांचा घाट आता फक्त 10 मिनिटांत; पाहा नवा मार्ग कसा असेल?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 18 January 2026, 9:56

Pune Satara Highway: पुणे : पुणे-सातारा महामार्गावरील (Pune-Satara Highway) खंबाटकी घाटातील धोकादायक ‘एस’ आकाराच्या तीव्र वळणाच्या रस्त्याला पर्याय म्हणून नवे दोन बोगदे तयार करण्यात आले आहेत. प्रत्येकी तीन पदरी असलेले हे दोन बोगदे असून त्यांचे काम सुमारे 6 वर्षांपासून सुरू आहे. सध्या हे काम सुमारे 90 टक्के पूर्ण झाले आहे. त्यापैकी साताऱ्याकडून पुण्याकडे येणारा एक बोगदा शनिवारपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. बोगद्याच्या उताराजवळील दरी पुलाचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने सध्या प्रायोगिक तत्त्वावर केवळ हलक्या वाहनांसाठी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. या बोगद्यामुळे प्रवासाचा वेळ सुमारे 20 ते 25 मिनिटांनी कमी होणार आहे.

खंबाटकी घाटातील सध्याचा रस्ता हा तीव्र उताराचा आणि ‘एस’ आकाराच्या वळणांचा असल्याने येथे अपघातांचे प्रमाण अधिक होते. घाट रस्त्यावर काही ठिकाणी दुहेरी लेन असल्याने वाहतुकीचा वेग कमी होतो. वीकएंड आणि सुट्ट्यांच्या काळात येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. ही समस्या दूर करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दोन नव्या बोगद्यांच्या निर्मितीला फेब्रुवारी 2019 मध्ये मान्यता दिली. करोनाच्या काळात कामाची गती मंदावली होती, त्यामुळे प्रकल्पास मुदतवाढ देण्यात आली असून मार्च 2026 पर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

 

हा नवा रस्ता सुमारे 6.46 किलोमीटर लांबीचा आहे. डाव्या बाजूला 1307 मीटर आणि उजव्या बाजूला 1224 मीटर लांबीचा तीन पदरी बोगदा तयार करण्यात आला आहे. तसेच डाव्या बाजूला 1104 मीटर आणि उजव्या बाजूला 930 मीटर लांबीचा व्हायाडक्ट उभारण्यात येत आहे. पुण्याच्या बाजूला बोगदा संपल्यानंतर कॅनॉलपर्यंत दरी पूल बांधण्यात येत असून त्याचे सुमारे 15 टक्के काम बाकी आहे.

या बोगद्यांमुळे पूर्वी 45 मिनिटे लागणारा खंबाटकी घाटाचा प्रवास आता 10 ते 15 मिनिटांत पूर्ण होणार आहे. इंधनाची बचत होणार असून प्रवास अधिक सुरक्षित होईल. शनिवारी झालेल्या चाचणीवेळी साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. सर्व काम पूर्ण झाल्यानंतर जुना घाट रस्ता बंद केला जाण्याची शक्यता असून धोकादायक ‘एस’ आकाराचे वळण इतिहासजमा होणार आहे, असे एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Daily Horoscope: मंगळवारचा दिवस कोणासाठी ठरेल भाग्याचा? वाचा तुमचे राशीभविष्य

Tuesday, 9 June 2026, 9:14

शिक्रापूर पोलीस ठाण्याला मिळाले नवे नेतृत्व; दीपरत्न गायकवाड यांच्याकडे जिल्हा विशेष शाखेची जबाबदारी

Monday, 8 June 2026, 23:01

पुणे विद्यापीठात 11 जूनला मोठा राडा? शिक्षण मंत्र्यांविरोधात ‘कॉक्रोच जनता पार्टी’ची आंदोलनाची हाक

Monday, 8 June 2026, 22:19

पुण्यात अंमली पदार्थांचे मोठे रॅकेट उघड! खराडीत 13 किलो अफूचा चुरा जप्त; राजस्थानच्या तस्कराला गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

Monday, 8 June 2026, 21:39

पुण्यात दिवाणी दाव्याच्या रागातून भावानेच पेटवलं भावाचं घर; खिडकी तोडून जीव वाचवल्याने मोठा अनर्थ टळला

Monday, 8 June 2026, 21:01

पुण्यात तलाठी आणि खासगी एजंटला रंगेहाथ अटक! ‘काम करायचं तर पैसे द्यावे लागतील’ म्हणत मागितली 70 हजारांची लाच

Monday, 8 June 2026, 20:39
Next Post

तुमच्या सोसायटीत बिल्डर मेंटेनन्स देत नाहीये? हायकोर्टाचा 'हा' निर्णय वाचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.