पुणे : पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राजगुरुनगरमध्ये दोन लहान बहिणींची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. बुधवारी दुपारी या मुली घराबाहेर खेळत असताना अचानक बेपत्ता झाल्या. आणि रात्री शहराबाहेर एका इमारतीच्या बाजूला दोन्ही चिमुकलींचे मृतदेह आढळून आले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दुर्वा मकवाने (वय-8) आणि कार्तिकी मकवाने (वय-9) अशी हत्या झालेल्या मुलींची नावे आहेत
मिळालेल्या माहितीनुसार, राजगुरूनगर येथे गुरुवारी दुपारी दोन चिमुकल्या बहिणी घराजवळ खेळत होत्या. त्यावेळी अचानक खेळता खेळता त्या दोघेही गायब झाल्या. दरम्यान, पालकांनी दोन्ही चिमुकलींना शोधण्यासाठी संपूर्ण परिसर पिंजून काढला होता. पण त्यांचा काही शोध लागला नाही. रात्री उशिरापर्यंत शोधाशोध केल्यानंतर त्या दोघींचे मृतदेह राजगुरूनगर शहरातील एका इमारतीच्या ड्रममध्ये दयनीय अवस्थेत सापडले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी चांडोली ग्रामीण रुग्णालयात पाठवले असून बेपत्ता झालेल्या या दोन मुलींसोबत काय झाले? याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेनं राजगुरूनगर शहरात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेने पुण्यासह राजगुरुनगर परिसर हादरले. पोलिसंकडून या घटनेचा कसून तपास केला जात आहे. या घटनेमुळे महिला व मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.