पुणे : होळी आणि शिमग्याच्या निमित्ताने गावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी अतिशय मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे पुणे रेल्वे विभागानं होळीनिमित्त प्रवाशांसाठी खास व्यवस्था केली आहे. पुणे ते दानापूर गोरखपुर आणि मुझफ्फरपुरसाठी एकूण 13 विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे.
उन्हाळ्याच्या सुट्टीत लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना मोठी गर्दी असते. त्यामुळे प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून रेल्वे स्टेशनवर मोठा मंडप देखील टाकण्यात आला आहे. तसेच प्रवाशांसाठी खास व्यवस्था रेल्वे कडून करण्यात आली असल्याची माहिती पुणे विभागीय रेल्वे मंडळाचे अध्यक्ष राजेश कुमार वर्मा यांनी दिली आहे. रेल्वे प्रशासनाकडून विशेष ट्रेन सोडण्यात येणार असल्याने उत्साहाचे वातावरण प्रवाशांमध्ये निर्माण झाले आहे.
पुणे दानापूर विशेष गाडी क्रमांक ०१४१९ विशेष ट्रेन पुणे येथून ११ मार्च रोजी १९.५५ मिनिटांनी सुटेल. तसेच तिसऱ्या दिवशी ४.३० वाजता दानापुरात पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४२० ही विशेष ट्रेन दानापूर येथून १३ मार्च रोजी ६.३० वाजता सुटेल आणि पुण्यात दुसऱ्या दिवशी १७.३५ वाजता पोहोचेल.
कलबुर्गी- सर एम विश्वसरया टर्मिनल बेंगळुरू विशेष – (४ फेऱ्या) गाडी क्रं (०६५२०) ही विशेष ट्रेन कलबुर्गी येथून १४.०३.२०२५ आणि १५.०३.२०२५ रोजी ०९.३५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २०.०० वाजता बेंगळुरू येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०६५१९ ही विशेष ट्रेन बंगळुरू येथून १३ मार्च आणि १४ मार्च रोजी रात्री २१.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७. ४० वाजता कलबुर्गी येथे पोहोचेल.
पुणे – मालदा टाउन विशेष ट्रेन (२ फेऱ्या) गाडी क्रं (०३४२६) विशेष ट्रेन पुणे येथून २३.०३.२०२५ रोजी २२.०० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी १६.३० वाजता मालदा टाउन येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०३४२५ ही ट्रेन मालदा टाऊन येथून २१ मार्च रोजी १५.३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ११. ३५ मिनिटांनी पुण्यात पोहोचेल.
हडपसर-हिसार विशेष ट्रेन (४ फेऱ्या) गाडी क्रं (०४७२६) ही विशेष ट्रेन हडपसर येथून १०.०३.२०२५ आणि १७.०३.२०२५ रोजी १७.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २२.२५ वाजता हिसार येथे पोहोचेल. गाडी क्रं (०४७२५) ही विशेष ट्रेन हिसार येथून ०९.०३.२०२५ आणि १६.०३.२०२५ रोजी ०५.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १०.४५ वाजता हडपसर येथे पोहोचेल.