लोणी काळभोर: पंचनामा या सदराला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर ‘पुणे प्राईम न्यूज’ वाचकांसाठी आणखी चार नवीन सदर घेऊन येत आहे. यामध्ये ‘जनमानस, आरोग्यम, आम्ही सारे खवय्ये आणि नारी उवाच’चा समावेश आहे.
‘जनमानस’ या सदरामध्ये सर्वसामान्य नागरिकांना व्यक्त्त होण्याची मोठी संधी प्राप्त होणार आहे. यामध्ये नागरिक त्यांना येणाऱ्या प्रशासकीय, वाहतूक, रस्ते, शाळा- महाविद्यालये, महसूल, पाणीपुरवठा, शेती, राज्यासह देशभरात घडणाऱ्या घडामोडींवर भाष्य करू शकतात. तसेच युवकांसाठी तर त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी हे खुले व्यासपीठ असणार आहे. हे सदर दर मंगळवारी प्रसिद्ध होईल.
माणसाच्या हृदयाचा रस्ता त्याच्या पोटातून जातो. त्यामुळे चमचमीत पदार्थांनी आपला आत्मा तृप्त करण्याच्या प्रयत्नात आपण कायम असतो असतात. प्रत्येकवेळी नवीन आणि वेगळं कुठे खायचं? यासाठी आपण विविध माध्यमं शोधत असतात. ही तुमची चिंता दूर करण्यासाठी ‘पुणे प्राईम न्यूज’ घेऊन येत आहे ”आम्ही सारे खव्वये”. यामध्ये पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल्ससोबतच इतर खाण्याच्या ठिकाणांची माहिती असणार आहे. तसेच प्रत्येकाची खाण्याची इच्छा पूर्ण होईल, अशा ठिकांणांची माहिती प्राधान्याने दिली जाणार आहे. हॉटेलिंग क्षेत्रातील नामवंत शेफसह मालकांच्या मुलाखती देखील असणार आहेत. हे सदर शुक्रवारी वाचकांच्या भेटीस येणार आहे.
महिलासह युवतींना मत मांडण्यासाठी आणि विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी ‘पुणे प्राईम न्यूज’ ”नारी उवाच” हे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. सामाजिक बदल घडवण्याच्या प्रक्रियेत महिलांना सहभागी करून घेणे, या विचारातून हा उपक्रम सुरु करण्यात येत आहे. शारीरिक, भावनिक, आर्थिक अशा तीन प्रकारच्या असुरक्षिततेशी सामना करावा लागणाऱ्या स्त्रिया वैयक्तिक, सामाजिक प्रश्नांवर बोलत्या आणि कर्त्याही झाल्या पाहिजेत. तसेच त्यांना आपल्या मनातलं मांडता यावे, हा या उपक्रमा पाठीमागचा हेतू आहे. या सदरात प्रत्येक क्षेत्रात यशस्वी झालेल्या महिलांच्या यशोगाथांचा देखील समावेश असणार. यामध्ये प्रत्येक महिला आणि युवती सहभाग घेऊ शकता. हे सदर दर शनिवारी प्रसिद्ध होईल.
आजच्या जीवनशैलीनुसार प्रत्येकाने आरोग्याबाबत सजग असणे आवश्यक आहे. परंतु, बहुतेकजण आपल्या आरोग्याची म्हणावी तशी काळजी घेत नाहीत. म्हणूनच ‘पुणे प्राईम न्यूज’ने नागरिकांना आरोग्यविषयक गोष्टींबाबबत जागरूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ‘आरोग्यम’ हे सदर सुरु करत आहोत. यामध्ये नामवंत डॉक्टरांसह वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ञ लोकांचे आरोग्य विषयक समस्यांवर मार्गदर्शन मिळणार आहे. हे सदर गुरुवारी प्रसिद्ध होईल.
आशा आहे की जो प्रतिसाद तुम्ही ‘पंचनामा’ या सदारला जो प्रतिसाद दिला, तो नवीन सदरांना देखील मिळेल हि अपेक्षा.