Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Prime News Impact: अखेर समर्थ क्रॉप केअरचा संस्थाचालक प्रशांत गवळी 7 संचालकांसह फरार; गुंतवणूकदारांनी हडपसर येथील कार्यालय फोडले

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 6 December 2025, 18:27

पुणे, ता. 6 : हडपसर (पुणे) येथील समर्थ क्रॉप केअरचे संस्थाचालक प्रशांत गवळी व त्याचे 7 संचालक हे फोन बंद करून फरार झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मागील पाच महिन्यांपासून परतावा तर सोडाच पण मुद्दलही न मिळाल्याने गुंतवणूकदारांचा सहनशक्तीचा बांध फुटला आहे. संतप्त झालेल्या गुंतवणूकदारांनी समर्थ क्रॉप केअरचे हडपसर येथील कार्यालय शुक्रवारी (ता.5) फोडले आहे. ”पुणे प्राईम न्यूज”ने हा घोटाळा उघडकीस आणून खूप मोठे यश संपादन केले आहे. वेळोवेळी बातम्या प्रसिद्ध करून हजारो नागरिकांना भविष्यात होणाऱ्या फसवणूकीपासून वाचवले आहे.

 

संस्थाचालक प्रशांत गवळी व त्याचे संचालक सुदामा दास, प्रकाश मांगने, नागनाथ जाधव, प्रकाश राठोड, ज्योतिबा काटकर, ओंकार कदम व चंद्रकांत राऊत हे सर्वजन आर्थिक घोटाळा करून फरार झाले आहेत. संस्थाचालक प्रशांत गवळी व संचालकांशी सद्या कसलाही संपर्क होत नाही. त्यामुळे पुण्यासह राज्यातील 12 हून अधिक जिल्ह्यातील 45 हजाराहून अधिक गुंतवणूकदारांना सर्व संचालकांनी 4 ते 5 हजार कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. गुंतवणूकदार पुढील दोन दिवसात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार आहेत. त्यामुळे राज्यातील हा एक मोठा आर्थिक घोटाळा असणार आहे.

समर्थ क्रॉप केअरने शेतमाल एक्सपोर्ट करण्याच्या नावाखाली पुण्यासह राज्यातील 12 हून अधिक जिल्ह्यातील गुंतवणूक दारांना समर्थ क्रॉप केअरने प्रतिमाह 10 टक्के परताव्याचे आमिष दाखविले होते. या फसव्या योजनेच्या माध्यमातून 45 हजाराहून अधिक गुंतवणूकदारांकडून 4 ते 5 हजार कोटी रुपयांहून अधिक माया गोळा केली आहे. प्रशांत गवळी याच्याकडे एवढी कोट्यावधी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जमा असतानादेखील गुंतवणूकदारांना आपली गुंतवणूक कुठल्या कंपनीमध्ये आहे. याची काडीमात्रसुद्धा त्यांना कल्पना नाही.

”पुणे प्राईम न्यूज”ने समर्थ क्रॉप केअरचा भांडाफोड केल्याने गुंतवणूकदारांनी या फसव्या योजनेत पैसे टाकणे बंद केले. त्यामुळे प्रशांत गवळीने डॅमेज कंट्रोल करण्यासाठी चौफुला (ता.दौंड) येथील स्वराज्य मंगल कार्यालयात मेळावा घेतला. यावेळी गवळी म्हणाला की, सध्या आर्थिक अडचणी आल्या आहेत. पण त्या तापुरत्या आहेत. कंपनी सर्व गुंतवणूकदारांना न्याय देणार आहे. कोणाचाही पैसा बुडविणार नाही. फक्त मला थोडा अवधी द्या. अफवांवर विश्वास ठेवू नका. त्यामुळे मी कुठेही असलो तरी तुमच्या खात्यात पैसे येतील. तेव्हा सध्याची वेळ मारून नेल्यासाठी गुंतवणूकदारांना 3 टक्के परतावा देण्याचे नवीन गाजर दाखवले होते. तसेच 1 डिसेंबरला परतावा देण्याचे आश्वासन दिले होते.

मागील पाच महिन्यांपासून गुंतवणूकदारांना एक दमडीही परतावा दिलेला नाही. संस्थेची सर्व आर्थिक गणिते कोलमडल्याने संस्थाचालक प्रशांत गवळी हा गुंतवणूकदारांना फक्त ‘तारिख पे तारिख देत होता. जोपर्यंत भांडवल येण्याचा वेग जास्त होता. तो पर्यंत समर्थ क्रॉप केअरने गुंतवणूकदारांना परतावा दिला आहे. परंतु, या योजनेत परतावा देण्याचा वेग जास्त झाल्याने त्यांना परतावा देण्याचे शक्य नव्हते. त्यामुळे ही योजना पाचमहिन्यापूर्वीच बंद पडली होती. इथून मागच्या फसव्या योजनांचा अनुभव पाहता, एकाही कंपनीने कुठल्याच गुंतवणूकदारांचे परतावा सोडा मूळ मुद्दलही परत केलेली नाही. त्यामुळे प्रशांत गवळी व त्याचे 7 भागीदार गुंतवणूकदारांना केवळ पुढील तारखा देऊन गाशा गुंडाळून पळून जाण्याच्या तयारीत होते. तर गुंतवणूकदार आज नाहीतर उद्या पैसे मिळतील? अशी आस लावून बसले होते. परंतु, तेवढ्या काळातच प्रशांत गवळी हे संचालकांसह फरार झाला आहे.

दरम्यान, या प्रकारच्या फसव्या योजनेमध्ये गुंतवणूकदारांना मूळ मुद्दल मिळण्याची कधीच “शाश्वती” नसते. कारण या योजनेचा मूळ हेतू साखळीपद्धतीने पैसे गोळा करणे, सुरवातीला काही महिने परताव्याचे आमिष दिले जाते. परंतु, साधारणता 19 ते 20 महिने हे ठग पैसे गोळा करण्यासाठी नाना क्लुप्त्या वापरतात. ठराविक वेळेनंतर गुंतवणुकीचा ओघ कमी झाला आणि परताव्याचा वेग वाढला की, ठराविक रक्कम जमा झाल्याची खात्री पटल्यानंतर हे ठग गाशा गुंडाळून परदेशात पोबारा करतात. हा इथून मागच्या सर्व प्रकरणांचा इतिहास आहे.

हडपसर येथील समर्थ क्रॉप केअरचे कार्यालय फोडले

सध्याच्या एकंदरीत परिस्थितीवरून परतावा तर सोडा मूळ मुद्दलही मिळणे कठीण झाल्याचे गुंतवणूकदारांना दिसून आले आहे. त्यामुळे त्यांनी हडपसर येथील समर्थ क्रॉप केअरचे कार्यालय गाठले. परंतु, त्यांना तेथेही कोणीच आढळून आलेले नाही. तसेच सर्वांचे फोनही बंद झाले आहेत. त्यामुळे आपले पैसे बुडाल्याच्या रागातून संतप्त झालेल्या गुंतवणूकदारांनी हडपसर येथील समर्थ क्रॉप केअरचे कार्यालय फोडले आहे.

गुंतवणूकदारांना कपाळावर हात मारण्याची आली वेळ ?

मागील पाच महिन्यांपासून समर्थ क्रॉप केअरने कुठल्याही गुंतवणूकदाराला एक छदामही परतावा दिला नाही. पुणे प्राईम न्यूजने भविष्यातील धोके ओळखून गुंतवणूकदारांना जागरूक करण्याचे प्रयत्न केले. हा ठग कोणत्याही गुंतवणूकदारांना एक दमडीही देणार नाही. गवळी आणि त्याचे साथीदार परदेशात फरार होण्याअगोदर गुंतवणूकदरांनो, तुम्ही तुमच्या पद्धतीने मूळ मुद्दल काढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करावेत. असे सांगितले होते. परंतु, हे सर्व ठग फरार झाल्याने सर्व गुंतवणूकदारांना आता कपाळावर हात मारण्याची वेळ आली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांनो लक्ष द्या! खत खरेदीचे नियम बदलले; आता ‘हा’ आयडी नसेल तर रिकाम्या हाती परतावे लागणार

Thursday, 2 April 2026, 10:05

गावी निघालेल्या पत्नीच्या बसचा पाठलाग ठरला जीवघेणा; कोरेगाव मूळ येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 9:57

सराईत ‘राठ्या’च्या खिशात हात घातला अन् पोलीसही हादरले! मुलीला शोधताना समोर आलं पुण्यातील मोठं रॅकेट

Thursday, 2 April 2026, 9:22

शेतकऱ्यांसमोर सरकार झुकले! ‘शक्तिपीठ महामार्गा’चा नकाशा बदलला; जाणून घ्या अधिक माहिती

Thursday, 2 April 2026, 8:47

पुण्यात मोठ्या रक्तपाताचा कट? ‘ती’ कार सुसाट होती, पोलिसांनी थांबवली गाडी अन् समोर जे आलं ते पाहून सगळेच थक्क!

Thursday, 2 April 2026, 8:33

इराण गुडघ्यावर! हॉर्मुझची कोंडी आणि अमेरिकेचा मोठा विजय; ट्रम्प यांनी केली ऐतिहासिक घोषणा

Thursday, 2 April 2026, 8:15
Next Post
Pune Metro: 4 suburbs of Pune will get metro power! State government's 'green signal' for 16 km expansion worth Rs 5704 crore

Pune Metro: पुण्याच्या 4 उपनगरांना मिळणार मेट्रोचे बळ! 16 किमीच्या 5704 कोटींच्या विस्ताराला राज्य सरकारचा 'ग्रीन सिग्नल'

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.