पुणे : पुणे शहर व जिल्ह्यातील सर्व सामान्य माणसाला सध्या अनेक नागरी समस्यांचा सामना करावा लागत आहे. या समस्या सोडविण्यासाठी ”पुणे प्राईम न्यूज” नेहमी अग्रेसर राहणार असून नागरिकांच्या समस्येला वाचा फोडण्याचे काम केले जाणार आहे. त्यानुषंगाने सुरु करण्यात आलेल्या ‘पंचनामा’ या सदराखाली आज (सोमवारी) सायंकाळी सात वाजता हवेली तालुक्यातील एका ‘बड्या’ सदन गावातील तलाठी कार्यालयातील गैरकारभाराचा पंचनामा’ प्रसिद्ध होणार आहे. तरी वाचकांनी ‘पंचनामा’ चे पहिले सदर नक्की वाचावे.
नागरिकांना महसुल, पोलिस, वाहतूक, महावितरण, पाणी पुरवठा, सार्वजनिक आरोग्य, सेतू, शिक्षण अशा अनेक समस्या प्रामुख्याने भेडसावत आहेत. मात्र या समस्यांची दखल ना स्थानिक लोक प्रतिनिधींकडून, ना प्रशासनाकडून घेतली जात नाही. त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे येथून पुढे तुमच्या प्रत्येक समस्येची दखल आपले लोकप्रिय वर्तमानपत्र “पुणे प्राईम न्यूज” कडून घेतली जाणार आहे. साध्या कामासाठीही आपली शासकीय कार्यालयांकडून अडवणुक होत असेल, तर तुम्ही आम्हाला ”पुणे प्राईम न्यूज”च्या [email protected] या मेलवर कळवू शकता. त्यानंतर ”पुणे प्राईम न्यूज”कडून नागरिकांनी पाठवलेल्या समस्येची खातरजमा आणि पडताळणी केली जाईल. प्रत्येक अडचणींबाबत आवाज उठवण्याचे काम ”पुणे प्राईम न्यूज”कडून केले जाणार आहे.
शासकीय कार्यालयात नागरिकांना आपल्या सरळ कामांसाठीही प्रशासनाकडून अरेरावीची व प्रोटोकॉलची भाषा ऐकावी लागते. सरळ व नियमात बसत असतानाही केवळ चिरीमिरी मिळवण्यासाठी अनेक अधिकारी नागरिकांची कामे आडवून ठेवतात. अशा कामांबाबत यंत्रणेला ‘पंचनामा’च्या माध्यमातून जाब विचारला जाणार आहे. नागरिकांच्या समस्यांची बातमी देताना तक्रार करणाऱ्याला काही अडचण असल्यास, त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. शासकीय अधिकाऱ्यांच्या बेकायदा कामांचा भांडाफोड करण्यासाठी ‘ पंचनामा ‘ हे सदर सुरू करण्यात आले असून, नागरिक या उपक्रमाला भरभरून पाठिंबा देतील हीच अपेक्षा आहे.
जनार्दन दांडगे (मुख्य संपादक – पुणे प्राईम न्यूज)