पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (दि. 06 डिसेंबर) पुढील काही दिवस रेल्वे स्थानकांवर गर्दी होऊ शकते. त्यामुळे मध्य रेल्वेने महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकीट आजपासून दि. 02 ते 09 डिसेंबर दरम्यान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये पुणे रेल्वे स्थानकाचाही समावेश आहे.
मध्य रेल्वेने दिवाळीत काही दिवस महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म तिकीट बंद केले होते. त्याचा गर्दी नियंत्रणासाठी फायदा झाल्याचे दिसून आले. त्यामुळे मध्य रेल्वेने आता महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभुमीवर हा निर्णय घेतला आहे. प्रवाशांनी या कालावधीत सुरळीत आणि सुरक्षित प्रवास अनुभवासाठी त्यानुसार नियोजन करावे आणि नवीन नियमांचे पालन करावे, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.
प्लॅटफॉर्म तिकीट बंद असलेली रेल्वे स्थानके…
-पुणे विभाग : पुणे रेल्वे स्थानक
-मुंबई विभाग : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे आणि कल्याण.
-भुसावळ विभागः बडनेरा,
-अकोला, नांदुरा, मूर्तिजापूर, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड आणि नाशिक.
-नागपूर विभाग : नागपूर आणि वर्धा
-सोलापूर विभाग : सोलापूर रेल्वे स्थानक