पुणे : आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यात वारकरी हरिनामाच्या जपात दंग आहेत. पुण्याहून पायी पालखी निघाली आहे. वरूणराजा ही मध्ये मध्ये हजेरी लावत आहे. अशातच वारकरी भिजू आणि सामाजिक बांधिलकीची महत्त्वपूर्ण भूमिका म्हणून, पेट्रोल डीलर्स असोसिएशन पुणेने पालखी 2024 यात्रेत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना, पुनर्वापर केलेल्या प्लास्टिकपासून बनवलेल्या 10,000 रेन कव्हर्सचे वाटप करण्यात आले आहे. या उपक्रमाचा उद्देश हा वारकऱ्यांना त्यांच्या पंढरपूरच्या प्रवासात, विशेषत: या वर्षी 106 टक्के अपेक्षित असलेला मान्सून लक्षात घेता, त्यांना पाठिंबा देण्याचा आहे असे पेट्रोल डीलर्स असोसिएशन पुणेने म्हटले आहे.
पावसाळ्यात वारकऱ्यांना त्यांच्या प्रवासादरम्यान येणारी आव्हाने ओळखून पेट्रोल डीलर्स असोसिएशन पुणेने त्यांच्या आराम आणि सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून वितरीत केलेले रेन कव्हर, पावसापासून अत्यावश्यक संरक्षण प्रदान करतील, वारकऱ्यांना कमीतकमी व्यत्ययाने प्रवास चालू ठेवता येईल.
पेट्रोल डीलर्स असोसिएशन पुणेचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल यांनी म्हटले कि, “पालखी यात्रा ही वर्षानुवर्षे आदरणीय परंपरा आहे आणि वारकऱ्यांची भक्ती खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांच्या यात्रेचे महत्त्व आणि आगामी पावसाळ्याचा होणारा परिणाम समजून घेणे, अर्थपूर्ण रीतीने योगदान देणे हे आमचे कर्तव्य आहे असे आम्हाला वाटते.
हे वाटप समिती सदस्य कालिदास मोरे, अमर रेणुसे, अमित ठक्कर, आबा वाल्हेकर, क्षितीज कांकरिया, काव्या लडकत यांच्यासमवेत पंढरपूरच्या वारकऱ्यांच्या मार्गावर असलेल्या भैरोबनाला पेट्रोल पंपावर पार पडले आहे. ज्यात पावसाचे कवच गरजूंपर्यंत पोहोचले. तसेच असोसिएशनतर्फे दरवर्षी फूड पॅकेटचे वाटप केले जाते.