पुणे : महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत पुणे प्रादेशिक विभागातील पुणे परिमंडलाच्या ‘सवाल अंधाराचा’ या नाट्यकृतीने द्वितीय क्रमांकाचा तर औरंगाबाद प्रादेशिक विभागातील नांदेड परिमंडलाच्या ‘नजरकैद’ने प्रथम क्रमांकाचा करंडक पटकावला. कोल्हापूर येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात (दि. १० व ११ रोजी महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत पुणे प्रादेशिक विभागातील ‘सवाल अंधाराचा’(पुणे परिमंडल), औरंगाबाद- ‘नजरकैद’(नांदेड परिमंडल), नागपूर- ‘तो परत आलाय’ (चंद्रपूर परिमंडल) व कल्याण- ‘सलवा जुडूम’ (सांघिक कार्यालय, मुंबई) या प्रादेशिकस्तरावरील विजेत्या नाटकांचे सादरीकरण झाले. शनिवारी (ता. ११) थाटात झालेल्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे, चित्रपट अभिनेते ऋषिकेश जोशी यांच्याहस्ते मुख्य अभियंता व नाट्यनिर्माता सचिन तालेवार, अधीक्षक अभियंता व दिग्दर्शक राजेंद्र पवार यांच्यासह पुणे परिमंडलाच्या रंगकर्मींनी उपविजेत्याचा करंडक स्वीकारला.
या यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके यांची उपस्थिती होती. पाहुण्यांच्या हस्ते नाट्यस्पर्धेच्या वैयक्तिक गटातील विजेत्यांना स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
वैयक्तिक गटातील पुरस्कार
दिग्दर्शन– प्रथम – प्रमोद देशमुख (नांदेड) / द्वितीय – राजेंद्र पवार (पुणे), अभिनय (पुरुष)- प्रथम- प्रमोद देशमुख (नांदेड)/ द्वितीय – किशोर साठे (सांघिक कार्यालय, मुंबई), अभिनय (स्त्री)– प्रथम- पूर्वा देशमुख (नांदेड)/ द्वितीय- सोनाली बावस्कर (पुणे), नेपथ्य- प्रथम- संध्या चिवंडे (चंद्रपूर) / द्वितीय- उत्क्रांत धायगुडे, सुधाकर जाधव व सुनील वनमोरे (नांदेड), प्रकाशयोजना- प्रथम- सुनील भिसे व सुनील कांबळे (सांघिक कार्यालय, मुंबई)/ द्वितीय- रविंद्र गाडगे व सुहास पडोळे (चंद्रपूर), पार्श्वसंगीत- प्रथम- राजेश आरेकर व शैलेंद्र पाटील (नांदेड) / द्वितीय- विजय जाधव व अभिजित टेंभुर्णे (पुणे), रंगभूषा व वेशभूषा- प्रथम- पंडित तेलंग व गिरीश डोंणगावकर (नांदेड) / द्वितीय- महेशचंद्र तेलंग व सुशील विखार (चंद्रपूर), अभिनय उत्तेजनार्थ- सायली सायंकार (चंद्रपूर), प्रणाली निमजे (मुंबई ), राजकुमार सिंदगीकर (नांदेड) व संतोष गहेरवार (पुणे) तसेच बालकलाकार म्हणून भार्गवी शिंदे, अर्णव शिंदे व पलश रहाटे (सांघिक कार्यालय, मुंबई) यांना उत्तेजनार्थ पारितोषिके प्रदान करण्यात आली.