Pune News: पुण्यातील कसबा पेठेतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका कुत्र्यामुळे 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू (Dog Chase Accident) झाला आहे. ही घटना कसबा पेठेतील एका इमारतीत घडली आहे. कुत्रा मागे लागल्यामुळे तो भीतीपोटी धावत होता आणि धावता धावता थेट तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला. दुर्दैवाने यात त्याचा मृत्यू झाला. (Pune News)

मिळालेल्या माहितीनुसार, रमेश गायकवाड असं मृतकाचे नाव होते. तो इलेक्ट्रिशयनचे काम करत होता. तो कसबा येथील एका इमारतीत त्याच्या सहकारीसोबत काम करण्यासाठी आला होता. अचानक त्या अपार्टमेंटमध्ये कुत्रा चौथ्या मजल्यावरून खाली आला आणि रमेश यांच्या पाठी लागला. कुत्र्यांचा आवाज ऐकताच रमेश घाबरून पळाले. घाबरून ते तिसऱ्या मजल्याच्या खिडकीजवळ आणि खिडकीतून त्याचा तोल गेला आणि ते थेट जमिनीवर कोसळले. या घटनेत ते गंभीर जखमी झाले.
हेही वाचा- कदमवाकवस्तीत किरकोळ कारणावरून बापलेकांना मारहाण; नेमकं प्रकरण काय?
या घटनेनंतर कसबा परिसरात एकच खळबळ उडाली. रमेश यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रमेश यांच्या पत्नीने फरासखाना पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि कुत्र्याच्या मालकावर गुन्हा दाखल केला.







