Pune News : पुणे : बहीण भावाच्या अतूट नात्याचे विश्वासाचे बंधन म्हणजेच रक्षाबंधन. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात गावागावांमध्ये दरवर्षी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. (Pune News) यंदा पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना ३० ऑगस्ट २०२३ रोजी रक्षाबंधन या सणाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
३० ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाची सुट्टी
पुणे जिल्ह्यामधील प्राथमिक शाळांच्या २०२३ या शैक्षणिक वर्षाच्या सुट्टयांची यादी जानेवारी महिन्यात जाहीर झाली आहे. या यादीमध्ये २० नोव्हेंबर २०२३ रोजी येणारी गुरुनानक जंयतीची सुट्टी ही दीपावलीच्या सुट्टीमध्ये येत आहे. (Pune News) यामुळे ही सुट्टी राष्ट्रीय सणांच्या यादीमधून वगळण्यात आली आहे. त्याऐवजी ही सुट्टी बुधवारी (ता. ३० ऑगस्ट) रोजी रक्षाबंधनादिवशी जाहीर करण्यात आली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पैसे घेऊनही घराचा ताबा नाही; ज्येष्ठ महिलेची फसवणूक; दोघांवर गुन्हा दाखल
Pune News : दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर