Pune News : पुणे : सहकुटुंब मोठ्या आनंदाने महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापुरला निघाले होते. त्यादरम्यान पुण्यात काळजाचा ठोका चुकवणारा एक प्रसंग घडला आहे. सर्व पुणे स्थानकावर उतरले मात्र त्यांचा मुलगा रेल्वेच्या डब्ब्यातच राहिल्याचे त्यांच्या लक्षात आले. चिमुकला गाडीत राहिल्याने आई- वडिलांचे धाबे दणाणले होते. प्लॅटफॉर्मवर उतरलेल्या त्याच्या आई-वडिलांना उशीराने ही बाब लक्षात आल्यावर त्यांचे धाबे दणाणले. कुटुंबीयांनी तातडीने स्टेशन मास्तरांना गाठले. त्यांच्या प्रयत्नांमुळे गाडीत राहिलेला मुलगा त्याच्या आई-वडिलांना भेटला. (In Pune, an incident that missed the attention of parents: the boy stayed in the train)
आई-वडिलांबरोबर महालक्ष्मी एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या मुलाला तिकीट चेकरने कोल्हापूर या ठिकाणी आई-वडिलांच्या स्वाधीन केले आहे. त्याचे घडलं असं की, एक लहान मुलगा आई-वडिलांबरोबर महालक्ष्मी एक्सप्रेसने प्रवास करत होता. मात्र ट्रेन पुण्याला येताच त्याचे आई-वडिल प्लॅटफॉर्मवर उतरले. (Pune News) आई-वडिलांकडे जनरल तिकीट होतं. पण तरीही हे सर्वजण स्लीपर कोचमध्ये बसले होते.
टीसीच्या भीतीने स्टेशनवर उतरले अन्…
पुणे स्टेशनवर गाडी आली तेव्हा टीसीच्या भीतीपोटी सर्व कुटुंबीय प्लॅटफॉर्मवर उतरले. मात्र त्यांचा मुलगा मात्र स्लीपर कोचच्या डब्यातच राहिला. प्लॅटफॉर्मवर उतरल्यावर त्यांना आपल्यासोबत मुलगा नाहीये हे लक्षात आले. (Pune News) मुलगा गाडीतच राहिल्याचे लक्षात येताच त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. त्यांना चूक लक्षात येताच मुलाच्या आई-वडिलांनी स्टेशनवर असणारे तिकीट चेकर तिवारी यांच्याकडे धाव घेतली.
तिवारी यांनी महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये ड्युटी करत असणाऱ्या तिकीट चेकरला संपर्क साधला. व मुलाला शोधण्यास सांगितले. तेथील तिकीट चेक करने गाडीची तपासणी केली. तेव्हा सदर मुलगा स्लीपर कोचमध्ये झोपलेला होता. तिकीट चेकरने कोल्हापूर स्टेशनवर गाडीने थांबा घेतल्यानंतर तिथे डयुटीवर असलेल्या स्टेशन मास्तराकडे सोपवले. (Pune News) व याची माहिती पुण्यातील तिकीट चेकर तिवारी यांना माहिती दिली. मुलाची माहिती मिळतात आई-वडिलांना कोल्हापूरला जाणाऱ्या रेल्वेमध्ये बसवून देण्यात आलं. स्टेशन मास्तर तिवारी यांच्या प्रसंगावधानतेमुळं गाडीत राहिलेला मुलगा आई-वडिलांना सापडला आहे. त्यांनी दोघांचेही आभार मानले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी;‘स्वारगेट-मंत्रालय’नवी हिरकणी सेवा सुरू
Pune News : आळंदी मधील ‘त्या’प्रकारापूर्वीचा व्हिडीओ आला समोर; नेमकं काय घडलं?
Pune News : शरद पवारांना धमकी देणारा सागर बर्वे आहे तरी कोण? पोलीस तपासात महत्त्वाची माहिती उघड!