Pune News : पुणे : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) अचानकपणे बंद केलेली रातराणी बस सेवा पुन्हा आज गुरुवार (दि. 8 जून 2023) पासून सुरू केली जाणार आहे. त्यामुळे शहरात रात्रीचा प्रवास करणाऱ्या नागरिकांना दिलासा देणारी बातमी आहे. प्रायोगिक तत्त्वावर पहिल्या टप्प्यात पाच मार्गांवर ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. असे पीएमपीएमलकडून जाहीर करण्यात आले आहे. (Good news for Pune residents! Night bus service of PMPML will start on ‘Ya’ route from today)
काही कारणास्तव बंद पडलेली रातराणी बसमार्ग पुर्ववत होत आहे. मात्र यावेळी यात पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश नसून पुणे शहरातील पाच मार्गिकांचा समावेश आहे. मध्यरात्री येणाऱ्या एसटी बसेस, रेल्वे यांनी येणाऱ्या बाहेरील शहरातील प्रवाशी तसेच रात्रौपाळी करणाऱ्या (Pune News) हॉस्पीटल, विविध आयटी संस्था, कंपन्या, हॉटेल्स इ. मधील कर्मचाऱ्यांसाठी ही विशेष प्रवाशांच्या सुरक्षिततेचा व सुविधांना प्राधान्य देऊन ही बससेवा सुरु केली आहे. या बसेस रात्री पावणे बारा ते पहाटे पाच या कालावधीत धावतात. हि बससेना पुर्वी एक तासाच्या वारंवारितेने देण्यात येत आहे.
पीएमपीएमएलचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी गुरूवारपासुन रातराणी सेवा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. प्रवाशांच्या मागणीनुसार शहरातील (Pune News) पाच मार्गांवर रातराणी बस सुरू करण्यात येणार आहेत. रात्रीच्या वेळी प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून ही सेवा सुरू करत आहोत. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार बस फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. असे ओमप्रकाश बकोरिया म्हणाले आहेत.
नव्याने सुरु होणाऱ्या बसेसचे वेळापत्रक पुढील प्रमाणे
1) रातराणी मार्ग 1 – कात्रज ते शिवाजीनगर (नविन एसटी. स्टँड) स्वारगेट, शनिपार, म.न.पा. भवन
2) रातराणी मार्ग 2 – कात्रज ते पुणे स्टेशन स्वारगेट, नानापेठ, रास्ता पेठ
3) रातराणी मार्ग 3 – हडपसर ते स्वारगेट वैदुवाडी, रामटेकडी, पुलगेट
4) रातराणी मार्ग 4 – हडपसर ते पुणे स्टेशन पुलगेट, बॉम्बे गॅरेज, वेस्टएंड टॉकिज
5) रातराणी मार्ग पाच – पुणे स्टेशन ते एनडीए गेट 10 नाना पेठ, लक्ष्मी रोड, डेक्कन कॉर्नर
तसेच बस मार्ग क्र.114 म.न.पा. भवन ते म्हाळुंगेगांव या मार्गाचा विस्तार पाडळे चौका पर्यंत करण्यात येत आहे. हा मार्ग पुणे विद्यापीठ, बाणेरगांव, म्हाळुंगेगांव व पाडळे चौक असा असणार आहे. (Pune News) तरी या बससेवेचा लाभ प्रवाशी, नागरिक, विद्यार्थी, नोकरदार व महिला वर्ग यांनी घ्यावा असे आवाहन महामंडळा मार्फत केले गेले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्यात निवृत्त कर्नलही अडकला टास्क फ्रॉडच्या जाळ्यात; तब्बल अडीच कोटीला गंडा
Pune News : ओतूर पोलिसांची कामगिरी..! साडेचार लाखांचे गहाळ झालेले १९ मोबाईल मिळाले नागरिकांना परत..