Pune News : पुणे : कष्ट केल्यावर त्याच चिज व्हाव. पण जिवाच रान करून पिकवलेले टोमॅटो पात ते सात रूपये किलोन विकल. उत्पादन खर्च भागत नव्हता. त्यामुळे टोमॅटो बांधावर, रस्त्यावर फेकल्याने टोमॅटोचा लाल चिखल पहावयास मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटोचे प्लॅाट काढून टाकले. हातचे टोमॅटो चे पिक निघून गेल्यावर अचानक टोमॅटोचे दर वाढले.
अचानक टोमॅटोचे दर वाढले….
यातून आपल नशीबच फुटक अस म्हणण्याची वेळ आली. आता तब्बल कॅरेटला ३१०० रूपये दर टोमॅटोला आहे. अशी अवस्था सध्या शिरूर, जुन्नर, आंबेगाव टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे. त्यातून काही अंशी टोमॅटो चे फड असणाऱ्या शेतकऱ्यांना करोडो ची कमाई झाल्याची चर्चा आहे. Pune News
कोरोना नंतरच्या काळापासून टोमॅटो लावणाऱ्याच्या नशीबी नुसता लाल चिखल होता. काबाडकष्ट करून आणि पैसा ओतून पिकवलेले टोमॅटो पण बाजारात पाच रूपये किलोने कोणी घेईना. रक्त आटवून पिकवलेले लालभडक टोमॅटो पण त्याची पार माती झाली. दरच नाही त्यात पिकवलेले टोमॅटो काढण्याइतका पण पैसा मिळाला नाही. Pune News
टोमॅटो बाजारात नेऊन फुकटात देण्यासाठी सुद्धा पैसा लागतो पण तो जवळ नाही. शेतकऱ्यांनी बाजारात नेलेल्या टोमॅटो रस्त्यावर सोडून दिले. शहरातील बाजारच्या रस्त्यांवर पडलेले लालभडक टोमॅटोचे ढिगच्या ढिग बधून ना व्यापाऱ्याचा जीव कळवळला ना ग्राहकाचा. Pune News
दरम्यान, दुरस पीक घ्यायच म्हणून टोमॅटोच्या फ्लॅाटवर रोटर फिरवल. रसरसथीत लालभडक टोमॅटोचे खत केले. जे टोमॅटो कष्टान पिकवल. ते मातीत घालायची वेळ आली. पण करणार काय काढून टाकलेल्या लाल टोमॅटोच्या ढिगानं रानातील बांध लालेलाल झाले आहेत. त्याचा चिखल तुटवत शेतकरी दुसऱ्या पिकाच्या पेरणीला लागले होते.
रानातले,
टोमॅटोचे पिक काढून टाकले, रोटर फिरवले आणि बाजाराने उचल घेतली. ही उचल इतकी दंडगी ठरली की आज बाजारात टोमॅटोचा दर सव्वाशे दिडशे रूपये किलोवर गेला आहे. त्यातून टोमॅटो न पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या नशीबी पुन्हा चिखल आला आहे. दर आलाय पण उत्पन्न नाही. अशा कात्रीत सापडलेला शेतकरी कुजत पडलेल्या टोमॅटोच्या बांधाकडे पहात आहे. Pune News
टोमॅटोला भाव नव्हता पण पिक हाती होते. लाख दिड लाख रूपये खर्च केल्यावर उत्पादन निघत होते. २०० रूपये कॅरेटला भाव होता. खर्च निघत नव्हता म्हणून खरीप पिकाचे नियोजन केले. टोमॅटो पिकावर रोटर फिरवला. आणि नूकसान करून बसलो. आता पुन्हा टोमॅटो पिक घेतले असून टोमॅटो पिक बाजारात पोहचे पर्यंत अशाच पद्धतीने बाजारभाव राहू दे. अशीच प्रार्थना करावी लागणार आहे.
राजेश सांडभोर
(शेतकरी कवठे येमाई)