संतोष पारधी
Pune News खेड : वाकी बुद्रुक (ता.खेड) येथे पुरुषोत्तम मास अखंड हरीनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाची सांगता गुरुवर्य हभप दयानंद महाराज कोरेगावकर यांच्या काल्याच्या किर्तनाने मोठ्या उत्साहात झाली. (Pune News)
हभप एकनाथ महाराज टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रामस्थांच्या सहकार्याने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या किर्तनमालेत सतत सात दिवस सप्ताह काळात दररोज सकाळी काकडा आरती, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, सायंकाळी हरिपाठ, कीर्तन आणि रात्री पंचक्रोशीतील गावांचे भजन असा दिनक्रम होता.(Pune News)
गुरुवर्य हभप दयानंद महाराज कोरेगावकर यांच्या काल्याच्या किर्तनाने मोठा उत्साह…
यावेळी गावातील नागरिकांबरोबर युवा पिढी देखील ज्ञानेश्वरी पारायण करण्यास बसले होते. हभप दयानंद महाराज कोरेगावकर (कर्जत) यांनी आपल्या विनोदी शैलीत सामाजिक प्रश्नावर भाष्य करत उपस्थित समाजाची मने जिंकली.(Pune News)
दरम्यान, सलग आठ दिवस गावातील व पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील मान्यवर आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ किर्तनरुपी सेवेचा लाभ घेण्यासाठी येत होते. कीर्तन संपल्यानंतर अन्नप्रसाद वाढण्याचे काम गावठाणातील भैरवनाथ तरुण मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी केले. काल्याचे कीर्तन झाल्यानंतर सर्वांसाठी अन्नप्रसादाचे आयोजन काळूबाई तरुण मंडळाने केले होते.(Pune News)
यावेळी बाजार समितीचे माजी सभापती लक्ष्मणराव टोपे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, शिवसेना नेते राहुल गोरे, सरपंच वैशाली जरे, गावातील अनेक आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामभाऊ टोपे यांनी केले.