पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने प्रवाशासांठी ज्यादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता रावेत ते हिंजवडी आणि रावेत ते पिंपरी या दोन मार्गांवर पीएमपीच्या बसेस धावणार आहेत. याचा फायदा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना होणार आहे. त्यामुळे त्यांचा प्रवास आणखीनच सोयीस्कर होणार आहे.
पुणे महानगर महामंडळाच्या बसेस पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीत ४७२ मार्गांवरून धावतात. मात्र केवळ यातील दोन ते तीन मार्ग फायद्यात असून, अन्य मार्ग तोट्यात आहेत. या कारणामुळे आता पीएमपी प्रशासनाने नवीन मार्गांसाठी सुधारित धोरणाचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे.रावेत परिसरातून हिंजवडी आणि तळवडे भागात कामावर जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. रावेत ते हिंजवडी या मार्गावर 375 क्रमांक आणि रावेत ते पिंपरी या या मार्गावर क्रमांक 13 नंबर बस प्रवाशासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता रावेत परिसराचा मोठ्या प्रमाणात विकास झाला असून, सोसायट्या झाल्या आहेत. स्थानिकांना परिसरातून हिंजवडीला जाण्यासाठी बस सेवा उपलब्ध नाही. आता पीएमपीच्याच्या निर्णयामुळे रावेत ते हिजवडी बस सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे.