पुणे : नुकतीच पुण्यात संवाद बैठक पार पडल्यानंतर शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी त्यांची नाराजी व्हॉट्सॲप ग्रुपमधून व्यक्त केली आहे. पुण्यात दोन दिवसांपूर्वी संपर्क नेते उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीत गुपचुप वरिष्ठांशी बोलून निधी घेतात, सगळ्यांनी आपलं दुकान मांडलंय, स्वार्थाची पोळी भाजणं बंद केलं पाहिजे, अशी चर्चा पुण्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या ग्रुपमध्ये होत असल्याने शिंदेंच्या शिवसेनेत अंतर्गत कलह असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, पुणे येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, आमदार विजय शिवतारे, आमदार शरद सोनवणे, नुकताच पक्षात प्रवेश केलेले माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारीसुद्धा उपस्थित होते.